Featured post

MH BSc Nursing CET 2024 ची नोंदणी सुरू ; अर्ज कसा करावा? परिक्षा किती गुणांची असणार? Syllabus काय असणार?

MH BSc Nursing CET 2024 ची नोंदणी सुरू ; अर्ज कसा करावा? 


ही प्रवेश परीक्षा 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा, मुंबई मार्फत वैद्यकीय शिक्षणातील बीएससी नर्सिंग हेल्थ सायन्स अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेतली जाईल.

शैक्षणिक वर्ष 2024 - 25 प्रथम वर्ष B.Sc. Nursing आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी MH BSc Nursing CET 2024  ही Entrance Exam राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे

• ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करण्याची तारीख - 09 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024

• ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क भरण्याची शेवटची तारीख - 01 मार्च 2024

• MH BSc Nursing CET 2024: अर्ज कसा कराल?

• Step 1: अधिकृत MAH CET वेबसाइटला भेट द्या – mahacet.org.

• Step 2: CET Portal (Examination) लिंकवर क्लिक करा.

• Step 3: त्यानंतर ‘MH BSc Nursing CET 2024 साठी दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा. 

• Step 4: अर्जात आवश्यक ती सर्व  माहिती भरुन घ्यावी आणि आवश्यक असल्यास, नोंदणी शुल्क भरा.

• Step 5: अर्ज save करून सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज Download करुन ठेवा.

अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 👇 

B.Sc.Nursing-CET-2024  परीक्षेसाठी आवश्यक असणार्या महत्वपूर्ण बाबी 👇🏼👇🏼

1. B.Sc.Nursing-CET-2024 ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२ वी (विज्ञान) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

2.संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. 

3. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

4. दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

• B.Sc.Nursing-CET-2024 परिक्षा शुल्क - 
१. महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील (Open Category) उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी (ओ.एम.एस.) रु.८००/- परिक्षा शुल्क राहील. 

२. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती SC / अनुसूचीत जमाती ST /इतर मागास वर्ग OBC / भटक्या व विमुक्त जमाती (NT - A/B/C/D)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग EWS / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) यांना रु. ६००/-
परिक्षा शुल्क राहील. 
 
अर्ज भरण्याअगोदरच्या महत्वपूर्ण सुचना :
१. उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

२. ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

३. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. 

४. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

५. उमेदवाराने आपला अप्लिकेशन नंबर , पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नये.

६. अर्ज भरताना चांगल्या प्रतीचे कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र जवळ बाळगा.

अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 👇 

• Syllabus And Marking Scheme For  MH-B.Sc.Nursing CET-2024 :

1. MH-B.Sc.Nursing CET-2024 ही ऑनलाइन परीक्षा असेल आणि ती महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

2. या परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका असेल, प्रत्येकाला एक गुण असेल. एकापेक्षा जास्त निवडीचे प्रश्न सिंगल बेस्ट रिस्पॉन्स प्रकारचे असतील.

3. सामायिक प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी निर्धारित केलेल्या एचएससी परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांचा समावेश असेल.

4. पेपरचा कालावधी 1 तास 30 मिनिटांचा असेल. 

5. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.


• Distribution Of MCQs And Marks :
 
● परिक्षा किती गुणांची असणार? Syllabus काय असणार?

ही परीक्षा एकूण 100 गुणांची असणार आहे. 
syllabus, प्रश्न संख्या आणि एकूण गुण खालीलप्रमाणे:

Comments