- Get link
- X
- Other Apps
Featured post
- Get link
- X
- Other Apps
इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांची तारीख जाहीर
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१०वी) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आज जाहीर केला.
इ.१२वी लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर, इ.१०वी लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आला आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी, दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत पार पडेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल.
इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.
#exams #class10th #class12th
#sscexams #hscexams
#examschedule
Comments
Post a Comment
please do not comment any spam link in the comment box.